मंगळवार, ३ ऑगस्ट, २०१०

विद्यार्थ्यांनी काय गुन्हा केला?

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्‍यातील थेऊर या गावी पोलिसांनी फ्रेंडशिप डे निमित्त आयोजित रिफ्रेशर पार्टीत सुमारे ऐंशी-नव्वद विद्यार्थ्यांना मद्यधुंद अवस्थेत पकडले, ही बातमी सर्वच वर्तमानपत्रांत तसेच विविधवाहिन्यांवर दिवसभर दाखविण्यात येत होते. हे सर्व प्रतिष्ठित घरची मुले असल्याचेही सांगितले जात होते. ही पार्टी कशी आयोजित केली, कसे पैसे जमा केले, त्याच प्रकारे कसे ते फार्म हाऊसवर रात्री धिंगाणा घालत होते, याचे सर्व रसभरीत वर्णन सर्वच माध्यमे दाखवीत होती. त्याच प्रकारे आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक वाहिनी त्याचे विश्‍लेषण करीत होती. त्याच प्रकारे त्यांच्या पालकांनाही सल्ले देताना दिसत होत्या. त्याच प्रकारे पोलिसही अशा थाटात आपल्या प्रतिक्रिया देत होते जसे त्यांनी फार मोठे जागतिक दर्जाचे कार्य केले आहे. त्याच प्रकारे आम्ही कसे कायद्याचे रक्षक आहोत, त्याच प्रकारे हे सर्व प्रतिष्ठितांच्या घरची मुले असली, तरी आम्ही त्यांच्यावर कशी कारवाई केली, याबद्दल सांगत होती; मात्र या विद्यार्थ्यांची यात काही चूक मानायला हरकत नाही. कारण ते सर्वजण एकांतात असलेल्या ठिकाणी कोणालाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी ही पार्टी करत होते. त्यामुळे त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही;
मात्र आजही अनेक ठिकाणी एखाद्या समाजातील एखाद्या राष्ट्रपुरुषाची किंवा एखाद्या धर्मातील सणानिमित्त मोठ्या आवाजात डीजे सिस्टिमची भिंत लावून भर रस्त्यावर मद्य पिऊन लोक धिंगाणा घालतात. त्याच प्रकारे या आवाजाचा व या मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांच्या दांडगाईचा किती मोठा त्रास लोकांना सहन करावा लागतो, याबद्दल प्रसारमाध्यमेही बोलत नाहीत किंवा पोलिसही कारवाई करताना आठळतात नाहीत. या विद्यार्थ्यांची जशी सर्वच प्रसारमाध्यमांनी मोठी बातमी केली, तशी बातमी या सण-उत्सवांनिमित्त भर रस्त्यावर नशा करून धांगडधिंगा घालणाऱ्यांवर व लोकांना वेठीस धरणाऱ्यांवर कोणी चकारशब्द लिहिताना दिसत नाही किंवा पोलिसांत गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर कोणी कार्यवाही केल्याचे आढळत नाही, हे असे का घडते. याचे उत्तर मिळविण्यासाठी पोलिस आणि प्रसारमाध्यमांनीही आपल्या भूमिकांवर पुन्हा विचार करण्याची गरज मला वाटते.

शनिवार, २४ जुलै, २०१०

दूरचित्रवाणीचे संस्कार

दूरचित्रवाणी पाहणे कोणाला अवडत नाही. प्रत्येक जण विरंगुळ्यासाठी काही क्षण दूरचित्रवाणी संचासमोर बसून करमणूक करतो. तसेच दिवसभराचा ताण हलका करण्यासाठी दूरचित्रवाणी वाहिला जातो. सध्या दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्या खास एखाद्या विषयाला वाहिलेल्या आठळतात. काही फक्त मनोरंजन करण्यासाठी काही फक्त चोवीसतास बातम्या देण्यासाठी, तर काही पर्यावरणाची माहिती देण्यासाठी ओळखल्या जातात. त्यामुळे आज प्रेक्षकांना विविध विषयांना वाहिलेल्या वाहिन्या उपलब्ध आहेत. पण या सर्वांत करमणूक करणाऱ्या वाहिन्यांना जरा जस्तच प्रेक्षकवर्ग लाभत आहे. या वाहिन्यांवर टॅलेंट हंट म्हणून विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यातल्या त्यात सध्या विनोदी कार्यक्रमांनी केव्हाच खालची पातळी गाठली आहे. या कार्यक्रमांत अश्‍लील जोकही केले जातात. पणे तेही मुलाबाळांसमोर अनेक लोक हसत पहात असतात. त्याच प्रमाणे सध्या विविध वाहिन्यांवर डेली सोप सिरियल्स ठाण मांडून बसल्या आहेत. या मालिका एकदम उच्चभ्रू घरांतील असतात. त्यामुळे त्यांना साजेल अशीच त्यांची लाईफ स्टाईल दाखविली जाते. तसेच या सर्वच्या सर्व वाहन्यांवर टोकाचे संस्कार व टोकाचाच व्यभिचारही दाखवला जातो. अनेक मालिकांमध्ये एका पुरुषाचे अनेक स्त्रियांशी अफेअर असते, तर एका स्त्रीचे अनेक पुरुषांशी अफेअर असते. ही गोष्ट जशी कपडे बदलले जातात तसे हे लोक बदलताना दाखविले जाते. त्यामुळे भावी पिढीवर त्याच प्रकारचे सध्या संस्कार होताना दिसतात. म्हणतात की दूरचित्रवाणीचा प्रभाव लोकांवर पडतो व ते त्या प्रमाणे वागायला लागता व लोक जसे वागतात तेच दूरचित्रवाहिन्याही दाखवतात. म्हणजेच लोक वागतात म्हणून दूरचित्रवाहिन्या ते दाखवतात व दूरचित्रवाहिन्यांवर जे दिसत म्हणून लोक तसे वागतात असे म्हणण्याची वेळ आली आहे. या मालिकांमुळे समाजावर क
ोणता संस्कार होते हेच कळत नाही. त्यामुळे त्या बंद करणेच समाजस्वास्थ्याच्या दुष्टीने योग्य आहे.

गुरुवार, १५ जुलै, २०१०

समाजाचे यशस्वी मानसाचे मानदंड

आज समाजाचा बारीक विचार केला, तर समाज चंगळवादामुळे अधोगतीकडे चालला असेच चित्र पहावयास दिसते आहे. कारण आज समाजात वावरत असताना लोकांमध्ये प्रेम-दयाभाव या गोष्टींचा अभाव दिसून येतो. आज जो तो पैशांच्या पाठीमागे लागलेला दिसतो आहे. आज एकाच कुटुंबात त्यामुळे सर्वांचीच तोंडे वेगवेगळ्या दिशेने दिसतात. त्याच प्रकारे घरात एखादा निर्णय घ्यायचा असेल, तरी एकमेकांना विचारात घेतले जात नाही. त्याचे कारण प्रत्येकाचा इगो. आज समाजात एखादी व्यक्ती जीवनात यशस्वी झाली, हे मोजण्यासाठी फक्त पैसा हाच एक मानदंड लावला जातो. आज कित्येक वेळा गुणी माणसाजवळ जर पैसा नसेल, तर त्याला समाजात कोणतीही किंमत दिली जाता नाही. त्याची सतत हेटाळणीच केली जाते. मात्र, एखाद्या व्यक्तीकडे पैसा, बंगला, चारचाकी गाडी त्याच प्रकारे त्याची क्रयशक्ती पाहून त्याला सलाम केला जातो. आज त्याच व्यक्तीला समाजात मान आहे. त्याच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोण बदलतो. भले त्या व्यक्तीकडे कोणतीही गुणवत्ताका नसेना, त्याच्याकडे फक्त पैसा आहे, हाच त्याच्या यशाचा मापदंड आहे. त्याने तो पैसा कोणत्याही मार्गाने का मिळविला असेना. मात्र, एखादी व्यक्ती खरोखरच जाणकार आहे; पण त्याने दिलेला सल्लाही धड कोणी माणत नाही. त्याला सर्वचजण मुर्खात काढण्यासाठी सतत पुढे आलेले दिसतात. त्यामुळे आज समाजात जर यशस्वी व्हायचे असेल, तर तुमच्याकडे गुणवत्ता नसली तरी चालेल; पण फक्त पैसा हवा, असे मला वाटते.

बुधवार, १६ जून, २०१०

आजही तोच संघर्ष

नुकताच दूरदर्शनवर दिलीपकुमार यांचा पैगाम सिनेमा पाहण्यात आला. या चित्रपटात कामगार मालक संघर्ष दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाद्वारे साधारण साठच्या दशकातही (नक्की नाही) कामगार-मालक संघर्ष सुरू होता. त्यानंतर अनेक कामगार संघटना कामगारांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी तयार झाल्या. त्याच प्रकारे या संघटनांनी बऱ्यापैकी कामगारांचे प्रश्‍नही सोडवले. मात्र त्या काळीही कामगारांचे शोषण होत होते व ते आजही होत आहे. त्याकाळी कामगार अशिक्षित असल्यामुळे हक्क मागण्यासाठी ते फारसे उत्सुक नसत. मात्र आजही त्याच प्रकारे कामगारांची पिळवणूक होत आहे. आज कामगार संघटना या कंपन्यांतून हद्दपार झाल्या आहेत. तसेच आज पुर्वी प्रमाणेच कामगारांना करारावर घेतले जाते. त्यामुळे त्या कामगाराला कधीही कंपनी कमी करू शकते. त्याच प्रकारे आज कामगारही शिक्षित आहे; मात्र तरीही त्यांची पिळवणूक सुरू आहे. त्यामुळे देश प्रगती करित आहे, या वाक्‍याला काहीच अर्थ नाही असे, मला वाटते. कारण कामगारांसाठी आज आवाज उठविण्यासाठी कोणतीही संघटना नाही. आहेत त्या फक्त सरकारी खात्यांत व या संघटनांच्या माध्यामातून सरकारी कर्मचारी आपल्या अवास्तव मागण्या पूर्ण करून घेताना दिसत आहेत. मात्र खासगी क्षेत्रातील कामगारांसाठी कोणीही बोलण्यास पुढे येताना दिसत नाही. आज सुशिक्षित कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते, मात्र त्याकडे ना सरकारचे लक्ष ना लोकप्रतिनिधींचे त्यांना फक्त भांडवलदारांचे भले करून आपले भले करायचे असते. त्यामुळे ते अशा प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे या कामगारांना आज कोणीही वाली राहिला नाही असे दिसते. त्यामुळे कामगारांच्या प्रश्‍नासाठी कामगार संघटनांनी काम करण्याची गरज आहे.

शनिवार, ८ मे, २०१०

हृतिकची धक्काबुक्की

हृतिकची धक्काबुक्की
नुकतीच हृतिक रोशनने शिर्डीत पत्रकारांना धक्काबुक्की केल्याची बातमी वाचली. त्यामुळे सर्वच प्रसारमाध्यमांनी त्याला लगेचच खलनायक म्हणून लोकांसमोर आणायला सुरवात केली. त्याच प्रकारे त्याचा निषेधही करण्यात आला. त्याच प्रकारे त्याने माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली. मात्र, हृतिकने ट्विटरवर आपली बाजू लगेच मांडली आहे. आज स्वतःला पत्रकार म्हणून घेणाऱ्यांचे पीक समाजात जोरात फोफावते आहे. आज पत्रकार म्हणून मिरवणाऱ्यांना चार शब्दही धड बोलता येत नाहीत; पण पत्रकार म्हणून तो मोठी मिजास मिरवतो. त्याच प्रकारे पत्रकार म्हणून मिरवणारे हे लोक आपण किती लायकीचे आहोत, याचे कधीच मूल्यमापण करीत नाहीत. फक्त आपण पत्रकार आहोत, असे सांगूण आपणच आपल्या बुद्धीची दिवाळखोरी दाखवतात. अनेकांना काय प्रश्‍न विचारायचे याचीही अक्कल नसते, पण तरीही पत्रकार म्हणून फिरत असतात. त्याच प्रकारे अनेकांनातर एखादी घटना घडल्यावर त्या विषयाचे गांभीर्यच कळत नाही. त्याच प्रकारे आपण काय लिहितो आहे याचेही हे लोक कधी मूल्यमापण करीत नसतात. हृतिकच्या बाबतीत घडलेल्या घटनेत फडतूस पत्रकारांनी त्याचे फोटो काढले. फोटो काढून न देण्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्‍न आहे. तो म्हणाली काढू नका, तर कशाला फोटो काढायचे, एवढी अक्कलही त्यांना नाही. आणि नंतर तो रागावलातर लगेचच धक्काबुक्की केल्याचे साऱ्यांनीच बोंबलायचे. अशा पत्रकारांमुळेच समाज रसातळाला चालला आहे.

बुधवार, ५ मे, २०१०

वाढता वाढता वाढे महागाई

वाढता वाढता वाढे महागाई
वाढता वाढता रोजच वाढत आहे असेच सध्या महागाईचे वर्णन करावे लागेल. कारण रोजच एखादी वस्तू महाग होत आहे. त्यावर रकाणेच्या रकाणे भरून वृत्तपत्रांतून लिहून येत आहे. त्यावर लगेच सरकारचे ठरलेले उत्तर दुसऱ्या दिवशी छापले जाते की महागाई कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच प्रमाणे जे साठेबाजी करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. पण आतापर्यंत असे घडल्याचे ऐकिवात नाही. कारण महागाई वाढत आहे. पण कोणा व्यापाऱ्यावर कारवाई होताना दिसून येत नाही. महागाई वाढत आहे. त्याच प्रकारे जे लोक खासगी कंपन्यात किंवा अस्थापनांत काम करीत आहेत. त्यांचा पगार वाढण्या ऐवजी एकतर कमी होत आहे किंवा किंचित वाढत आहे. त्यामुळे हे लोकही पगारवाढ नसल्याने मेटाकुटीस आले आहेत. एकतर सरकार साठेबाजांवर ही कारवाई करीत नाही किंवा भांडवलदारांवर कामगार कायदे भंग केल्याची कारवाई करत नाही. त्यामुळे सामान्य नागरिक आज फक्त जगतो आहे तो फक्त झुरुण झुरुण मरण्यासाठीच हे कधी बदलणार. आजची स्थिती अशी आहे, की महागाई रोज वाढत आहे. मात्र पगार वर्षातून एकदाच वाढत आहे. तोही फक्त नावापुरताच.

गुरुवार, २२ एप्रिल, २०१०

फालतू क्रिकेट वेड

सध्या आयपीएलचा जोर आहे. प्रत्येक ठिकाणी क्रिकेट मॅचबद्दल बोलणारे दिसतात. त्याच प्रकारे पहावे तिकडे क्रिकेटचीच माहिती पहावयाला मिळते आहे. त्याच प्रकारे प्रसारमाध्यमेही वरच्यावर या क्रिकेटच्याबाम्यांवरच जास्त भर देताना दिसत आहेत. त्यामुळे सर्व वातावरण भारत क्रिकेटमय झाला आहे, असे सध्या वाटावे. त्या क्रिकेट ज्वराने लहान-मोठे, तरुण-तरुणी झपाटले आहेत. सकाळी उठल्यापासून लोक क्रिकेटवर चर्चा करण्यास सुरवात करतात. त्यात गरीब असोवा श्रीमंत, नोकर असोवा मालक असे सर्वच जण क्रिकेटपाई क्रेझी झालेले दिसतात; मात्र या लोकांना क्रिकेट वितिरिक्त किती समस्या उग्र आहेत याचे भान राहिलेले नाही. आज प्रत्येकाला राजकारणी व पैसेवाले क्रिकेटच्या नादाला लाऊन आपले खिसे भरण्यात धन्यता मानत आहेत. क्रिकेटमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टार होत असून, त्याच प्रकारे खेळाडू कोट्यवधी रुपये काही मॅच खेळून कमावित असतात. मात्र सामान्य लोक आपला रोजगार बुडवून या मोठ्या लोकांचा सट्टा पहात घरीच बसतात. तर काही जण कार्यालयांतही दूरचित्रवाहनीसमोर बसून काम करतात. अशा प्रकारे जर लोक क्रिकेटपाई लोक वेडे होत आहेत व भांडवलदार याचा भायदा उठवत आहेत. तरी लोकांनी वेळीच सावध व्हावे. एखाद्या खेळाच्या लोकांनी एवढ्या आहारी जाणे चांगले नाही देशाच्याही व नागरिकांच्याही हिताचे नाही.

मंगळवार, २० एप्रिल, २०१०

आज राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस ज्यांनी जनतेचे रक्षण करावयाचे तेच पैसे कमाविण्यात दंग आहेत. त्याच प्रकारे राजकारणीही कोणत्याही मार्गांनी रोज पैसा कसा कमावता येईल, येवढेच पाहत आहेत. जर असेच चालत राहिले, तर भारत देश तर रसातळाला जाईलच त्यामुळे जगालाही परिणाम भोगावे लागतील. आज जो तो उठतो सर्वसामान्यांनी हे केले पाहिजे, ते केले पाहिजे असे उठ सूठ डोस पाजत असतो. पण तुमच्या हातात अधिकार आहेत, तुम्ही ते का करीत नाहीत असा माझा सवाल आहे. बॅंबस्फोट झाला, की सामान्यांनी पोलिसांना लगेच माहिती दिली असती, तर अनेकांचे प्राण वाचले असते, असे म्हणून पोलिस व पुढारी बोलून मोकळे होतात. पण या घटना रोखण्यासाठी जी यंत्रणा उभी केली जाते ती काय फक्त सरकारला जास्त पैसे झालेत म्हणून त्यांच्या पगारावर खर्च करण्यासाठी का असे मला वाटते. त्याच प्रकारे महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे, तरीही गरिबांनी बचत केली पाहिजेत; पण श्रीमंतांनी मात्र मोठ मोठ्या पार्ट्या केल्या पाहिजेत व त्यात मोठ्या प्रमाणात अन्न नासाडी झाली पाहिजेत का. या सर्व गोष्टींचा विचार करून सामान्य मानसांना डोस पाजण्याचे आत बंद झाले पाहिजे.

बुधवार, ७ एप्रिल, २०१०

खेदजनक गोष्ट

छत्तीसगड येथील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी सत्तरच्यावर जवानांना ठार केले. हे वाचून दुखः झाले. त्याही पेक्षा कितीतरी पटीने आजची ही दुखःद घटना घडूनही माझे काही परिचित क्रिकेट मॅच पाहण्यासाठी धडपडत होते. त्यांच्या लेखी या शहीद जवानांची किंमत काहीच नाही, हे पाहून खेद वाटला; हे जवान का अशा देशातील लोकांचे संरक्षण करीत आहे, की जे एवढी मोठी घडना घडली असताना देशील क्रिकेटच्या मॅच पाहण्यात दंग आहेत. त्याच प्रकारे हे लोक क्रिकेट मॅच सुरू झाल्यावर आपले कर्तव्यही नीट पार पाडीत नाहीत, ही आनखी एक खेदजनक गोष्ट आहे. ही परिस्थिती कधी सुधारेल हे कळत नाही.

मंगळवार, ६ एप्रिल, २०१०

हे कधी बदलणार.

आज आपल्या देशासमोर महागाई, गरिबी, दहशतवाद आदी प्रश्‍न आहेत; मात्र या प्रश्‍नांचे देणे घेणे कोणालाही नाही. प्रत्येक जण स्वतःच्या संपत्तीत वाढ करण्याच्या मागे लागला आहे. कारण दुसरा गरीब झाला तरी चालेल; पण माझ्याकडे संपत्ती पाहिजे. आज समाजात फक्त पैशांना किंमत आहे. तो कसा मिळविला हा दुय्यम विषय आहे. पैसा आहे, तर तुम्हाला सर्वत्र मान आहे. तो तुम्ही कसा मिळविला या पेक्षा आहे याला महत्त्व आहे. त्यामुळे भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्याच प्रमाणे ज्यांनी हे सर्व रोकायला हवे आहे, त्यांचे हात यात बरबटलेले आहेत. त्यामुळे ज्यांनी देश वायवायला हवा तेच देश विकायला निघाले आहेत. प्रत्येक वेळी सामान्यांनी जाकरूक राहिले पाहिजे, यांनी जाकरूक राहिले पाहिजे असे सांगितले जाते. पण ते दुसऱ्यासाठीच असते. आपण ते नियम पाळायचे नसतात. नियम दुसऱ्यांसाठी असतात. आपल्यासाठी नियम पाळायसाठी नसतात तर तोडण्यासाठी असतात. मी म्हणतो हे देशाचे चित्र कधी बदलणार.