शनिवार, २४ जुलै, २०१०

दूरचित्रवाणीचे संस्कार

दूरचित्रवाणी पाहणे कोणाला अवडत नाही. प्रत्येक जण विरंगुळ्यासाठी काही क्षण दूरचित्रवाणी संचासमोर बसून करमणूक करतो. तसेच दिवसभराचा ताण हलका करण्यासाठी दूरचित्रवाणी वाहिला जातो. सध्या दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्या खास एखाद्या विषयाला वाहिलेल्या आठळतात. काही फक्त मनोरंजन करण्यासाठी काही फक्त चोवीसतास बातम्या देण्यासाठी, तर काही पर्यावरणाची माहिती देण्यासाठी ओळखल्या जातात. त्यामुळे आज प्रेक्षकांना विविध विषयांना वाहिलेल्या वाहिन्या उपलब्ध आहेत. पण या सर्वांत करमणूक करणाऱ्या वाहिन्यांना जरा जस्तच प्रेक्षकवर्ग लाभत आहे. या वाहिन्यांवर टॅलेंट हंट म्हणून विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यातल्या त्यात सध्या विनोदी कार्यक्रमांनी केव्हाच खालची पातळी गाठली आहे. या कार्यक्रमांत अश्‍लील जोकही केले जातात. पणे तेही मुलाबाळांसमोर अनेक लोक हसत पहात असतात. त्याच प्रमाणे सध्या विविध वाहिन्यांवर डेली सोप सिरियल्स ठाण मांडून बसल्या आहेत. या मालिका एकदम उच्चभ्रू घरांतील असतात. त्यामुळे त्यांना साजेल अशीच त्यांची लाईफ स्टाईल दाखविली जाते. तसेच या सर्वच्या सर्व वाहन्यांवर टोकाचे संस्कार व टोकाचाच व्यभिचारही दाखवला जातो. अनेक मालिकांमध्ये एका पुरुषाचे अनेक स्त्रियांशी अफेअर असते, तर एका स्त्रीचे अनेक पुरुषांशी अफेअर असते. ही गोष्ट जशी कपडे बदलले जातात तसे हे लोक बदलताना दाखविले जाते. त्यामुळे भावी पिढीवर त्याच प्रकारचे सध्या संस्कार होताना दिसतात. म्हणतात की दूरचित्रवाणीचा प्रभाव लोकांवर पडतो व ते त्या प्रमाणे वागायला लागता व लोक जसे वागतात तेच दूरचित्रवाहिन्याही दाखवतात. म्हणजेच लोक वागतात म्हणून दूरचित्रवाहिन्या ते दाखवतात व दूरचित्रवाहिन्यांवर जे दिसत म्हणून लोक तसे वागतात असे म्हणण्याची वेळ आली आहे. या मालिकांमुळे समाजावर क
ोणता संस्कार होते हेच कळत नाही. त्यामुळे त्या बंद करणेच समाजस्वास्थ्याच्या दुष्टीने योग्य आहे.

1 टिप्पणी: