गुरुवार, १५ जुलै, २०१०

समाजाचे यशस्वी मानसाचे मानदंड

आज समाजाचा बारीक विचार केला, तर समाज चंगळवादामुळे अधोगतीकडे चालला असेच चित्र पहावयास दिसते आहे. कारण आज समाजात वावरत असताना लोकांमध्ये प्रेम-दयाभाव या गोष्टींचा अभाव दिसून येतो. आज जो तो पैशांच्या पाठीमागे लागलेला दिसतो आहे. आज एकाच कुटुंबात त्यामुळे सर्वांचीच तोंडे वेगवेगळ्या दिशेने दिसतात. त्याच प्रकारे घरात एखादा निर्णय घ्यायचा असेल, तरी एकमेकांना विचारात घेतले जात नाही. त्याचे कारण प्रत्येकाचा इगो. आज समाजात एखादी व्यक्ती जीवनात यशस्वी झाली, हे मोजण्यासाठी फक्त पैसा हाच एक मानदंड लावला जातो. आज कित्येक वेळा गुणी माणसाजवळ जर पैसा नसेल, तर त्याला समाजात कोणतीही किंमत दिली जाता नाही. त्याची सतत हेटाळणीच केली जाते. मात्र, एखाद्या व्यक्तीकडे पैसा, बंगला, चारचाकी गाडी त्याच प्रकारे त्याची क्रयशक्ती पाहून त्याला सलाम केला जातो. आज त्याच व्यक्तीला समाजात मान आहे. त्याच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोण बदलतो. भले त्या व्यक्तीकडे कोणतीही गुणवत्ताका नसेना, त्याच्याकडे फक्त पैसा आहे, हाच त्याच्या यशाचा मापदंड आहे. त्याने तो पैसा कोणत्याही मार्गाने का मिळविला असेना. मात्र, एखादी व्यक्ती खरोखरच जाणकार आहे; पण त्याने दिलेला सल्लाही धड कोणी माणत नाही. त्याला सर्वचजण मुर्खात काढण्यासाठी सतत पुढे आलेले दिसतात. त्यामुळे आज समाजात जर यशस्वी व्हायचे असेल, तर तुमच्याकडे गुणवत्ता नसली तरी चालेल; पण फक्त पैसा हवा, असे मला वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा