शनिवार, ८ मे, २०१०

हृतिकची धक्काबुक्की

हृतिकची धक्काबुक्की
नुकतीच हृतिक रोशनने शिर्डीत पत्रकारांना धक्काबुक्की केल्याची बातमी वाचली. त्यामुळे सर्वच प्रसारमाध्यमांनी त्याला लगेचच खलनायक म्हणून लोकांसमोर आणायला सुरवात केली. त्याच प्रकारे त्याचा निषेधही करण्यात आला. त्याच प्रकारे त्याने माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली. मात्र, हृतिकने ट्विटरवर आपली बाजू लगेच मांडली आहे. आज स्वतःला पत्रकार म्हणून घेणाऱ्यांचे पीक समाजात जोरात फोफावते आहे. आज पत्रकार म्हणून मिरवणाऱ्यांना चार शब्दही धड बोलता येत नाहीत; पण पत्रकार म्हणून तो मोठी मिजास मिरवतो. त्याच प्रकारे पत्रकार म्हणून मिरवणारे हे लोक आपण किती लायकीचे आहोत, याचे कधीच मूल्यमापण करीत नाहीत. फक्त आपण पत्रकार आहोत, असे सांगूण आपणच आपल्या बुद्धीची दिवाळखोरी दाखवतात. अनेकांना काय प्रश्‍न विचारायचे याचीही अक्कल नसते, पण तरीही पत्रकार म्हणून फिरत असतात. त्याच प्रकारे अनेकांनातर एखादी घटना घडल्यावर त्या विषयाचे गांभीर्यच कळत नाही. त्याच प्रकारे आपण काय लिहितो आहे याचेही हे लोक कधी मूल्यमापण करीत नसतात. हृतिकच्या बाबतीत घडलेल्या घटनेत फडतूस पत्रकारांनी त्याचे फोटो काढले. फोटो काढून न देण्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्‍न आहे. तो म्हणाली काढू नका, तर कशाला फोटो काढायचे, एवढी अक्कलही त्यांना नाही. आणि नंतर तो रागावलातर लगेचच धक्काबुक्की केल्याचे साऱ्यांनीच बोंबलायचे. अशा पत्रकारांमुळेच समाज रसातळाला चालला आहे.

बुधवार, ५ मे, २०१०

वाढता वाढता वाढे महागाई

वाढता वाढता वाढे महागाई
वाढता वाढता रोजच वाढत आहे असेच सध्या महागाईचे वर्णन करावे लागेल. कारण रोजच एखादी वस्तू महाग होत आहे. त्यावर रकाणेच्या रकाणे भरून वृत्तपत्रांतून लिहून येत आहे. त्यावर लगेच सरकारचे ठरलेले उत्तर दुसऱ्या दिवशी छापले जाते की महागाई कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच प्रमाणे जे साठेबाजी करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. पण आतापर्यंत असे घडल्याचे ऐकिवात नाही. कारण महागाई वाढत आहे. पण कोणा व्यापाऱ्यावर कारवाई होताना दिसून येत नाही. महागाई वाढत आहे. त्याच प्रकारे जे लोक खासगी कंपन्यात किंवा अस्थापनांत काम करीत आहेत. त्यांचा पगार वाढण्या ऐवजी एकतर कमी होत आहे किंवा किंचित वाढत आहे. त्यामुळे हे लोकही पगारवाढ नसल्याने मेटाकुटीस आले आहेत. एकतर सरकार साठेबाजांवर ही कारवाई करीत नाही किंवा भांडवलदारांवर कामगार कायदे भंग केल्याची कारवाई करत नाही. त्यामुळे सामान्य नागरिक आज फक्त जगतो आहे तो फक्त झुरुण झुरुण मरण्यासाठीच हे कधी बदलणार. आजची स्थिती अशी आहे, की महागाई रोज वाढत आहे. मात्र पगार वर्षातून एकदाच वाढत आहे. तोही फक्त नावापुरताच.